जळगाव : प्रतिनिधी
रविवार रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यानीं व सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रमदानं देऊन महानगरपालिकेच्या नाकर्ते पनाचा जाहीर निषेध केला गेला गेल्या एक महिन्या पासून एमआयडीसीजवळ राका फर्निचर रोडावर औरंगाबाद राष्ट्रीय हायवेच्या वेस्ट मटेरियल मनपा हद्दीतील रोडवर टाकून रस्ता राहादारी करिता पूर्णतः बंद केला आहे .
तसेच मनपा इंजि.सोनावणी यांना सदर घटनेची माहिती दिली त्यांनी दोन दिवसात ठेकेदारावर दांडात्मक कारवाई करून रस्ता मोकळा करतो अस आश्वसन त्यांनी दिल होते.तसेच वेळोवेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी आयुक्त साहेबांना भेटून लेखी तक्रार दिली. त्या आधीपण तक्रार दिलेली आहे. मात्र अध्याप रस्त्या वर मलबा आहे त्या अवस्थेत आहे. २४ रविवार रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या च्या कार्यकर्ते यांनी श्रमदान देऊन जळगांव मनापाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.
मनपा सर्वसामान्यांच्या तक्रारीच केराची टोपली करते. सर्वसामान्यांच्या सार्वजनिक सुविधा पुरवण्यात तर कमकुवत पडत आहे पण जे होऊ शकते असे काम करण्याची सुद्धा अधिकाऱ्यांची मानसिकता नाही.
मनापाच एकच सूत्र झाल आहे आलेली तक्रारीच टाळाटाळ करण. जळगाव करांच्या आरोग्याचा विचार मनापा कर्मचारी अधिकारी सत्ताधारी कोणीही करण्यास तयार नाही. रस्ते गटारी,पथदिवे, स्वच्छता याबाबत मोठी उदासीनता जळगावकरानाच्या मनात निर्माण झाली आहे. याचं विषय घेऊन जळगाव शहर आम आदमी पार्टी संविधानिक मार्गातून झोपलेल्या मनापाला जाग करून जळगांकरांचे मूलभूत प्रश्न पूर्ण ताकतीने सोडवू असे मत महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी मांडले. यावेळी मीडिया योगेश भोई यांनी प्रचार प्रसार काम पाहिले तसेच पवन खांबयात व हेमराज सोनावणे यांनी नियोजन केले यावेळी उपस्थित कार्यकर्ते अनिल वाघ. तुकाराम चौधरी ,सुभाष कोळी माधवराव जाधव. प्रवीण चौधरी. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




















