• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

आरोग्य विमा योजनेला कसे कराल पोर्ट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2022
in Uncategorized
0
आरोग्य विमा योजनेला कसे कराल पोर्ट
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : प्रतिनिधी
मोबाइल क्रमांकाप्रमाणेच तुम्ही आरोग्य विमा योजना ही पोर्ट करू शकता. याला आरोग्य विमा पोर्टेबिलिटी (Portability) असे म्हणतात. जर विद्यमान विमा कंपनीच्या सेवेवर तुम्ही नाखूष असाल अथवा तिचा हप्ता जास्त आहे असे वाटत असेल, दाव्यांचा निपटारा लवकर होत नसेल आणि इतर काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्य विमा कंपनीत बदल करु शकता. तुमची आरोग्य विमा पॉलिसी पोर्ट करू शकता. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. लक्षात ठेवा की सर्व प्रकारच्या धोरणांमध्ये पोर्टेबिलिटी नसते.दुसरी कंपनी विम्याची सुविधा देईल आणि ग्राहकाच्या सुविधेनुसार आरोग्य विमा योजनेत बदल करु शकेल .विशेष बाब म्हणजे एका कंपनीतून दुस-या कंपनीत योजना पोर्ट करताना विमा सुरक्षा आणि सुविधा तशीच असेल. ग्राहकांना मिळणारे फायदे (Benefits)नव्या विमा कंपनीतही मिळतील. विमा पोर्टेबिलिटी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, विमा योजना सध्यस्थिती सुरु असावी. ती कोणत्याच कारणाने खंडीत अथवा बंद नसावी . पोर्ट करताना ज्या अटी व नियम आहेत, त्या पूर्ण केल्यानंतरच दुस-या कंपनीत तुमची योजना पोर्ट होते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कौटुंबिक अथवा वैयक्तिक दोन्ही विमा पॉलिसी पोर्ट केली जाऊ शकतात. पॉलिसीधारक कोणत्याही सामान्य किंवा विशेष विमा कंपनीची पॉलिसी दुसऱ्या सामान्य किंवा विशेष पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जेव्हा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची वेळ येते, तेव्हा त्याच कालावधीत तुम्ही ते पोर्ट करू शकता. पॉलिसीच्या कालावधीत आरोग्य पॉलिसी पोर्ट करता येत नाही.
या धोरणाचे वेळेत नूतनीकरण व्हावे, त्यात खंड पडू नये, ही पोर्टिंगसाठी मोठी अट आहे. मात्र, कंपनीकडून पॉलिसीमध्ये खंड पडल्यास त्यात ग्राहकांची चूक मानली जात नाही आणि पोर्टेबिलिटीला परवानगी दिली जाते. ज्या ग्राहकांना पोर्टेबिलिटी सेवा घ्यायची आहे, त्याने प्रथम आपल्या विद्यमान कंपनीला माहिती दिली पाहिजे. ही विनंती लेखी स्वरूपात द्यावी लागेल आणि ज्या कंपनीत तुम्हाला पोर्ट करायचे आहे, त्या कंपनीचे नाव द्यावे लागेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीत पॉलिसी नूतनीकरणासाठी 45 दिवस शिल्लक असताना करावे लागेल. त्यापूर्वी नव्या कंपनीकडे पोर्टसाठी विनंती करावी लागते. आरोग्य धोरण पोर्ट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. नव्या कंपनीत पोर्टिंग केल्यावर कंपनी आपल्या नियमानुसार प्रीमियम आकारते. कदाचित हा प्रीमियम आधीच्या कंपनीपेक्षा जास्त किंवा कमी असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसीमध्ये असे दिसून येते की, जेव्हा ते दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीत पोर्ट करतात तेव्हा त्यांना अधिक प्रीमियम भरावा लागतो. ग्राहकाला हवे असल्यास तो नव्या कंपनीत पॉलिसीची विमा रक्कम वाढवू शकतो.
पॉलिसी पोर्ट करण्यासाठी 45 दिवसांच्या आत नवीन कंपनीला याविषयीचा अर्ज करावा लागतो. त्यासाठी प्रस्ताव अर्ज भरावा लागतो. अर्जाद्वारे नवीन कंपनीकडे योजना हस्तांतरीत करण्यासाठी विनंती करावी लागते. अर्जात ज्या आरोग्य विमा सेवा पुरविणा-या कंपनीची सेवा नकोय, तिची माहिती द्यावी लागते. पोर्टिंगनंतर लगेचच पॉलिसी नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अधिकचा कालावधी देण्यात येतो.
प्रस्तावासोबत विमाधारकाचे नाव आणि अन्य सविस्तर माहिती द्यावी लागते. विम्याविषयी ही माहिती द्यावी लागते. या अर्जासोबत विमा योजना नुतनीकरणासाठीची नोटीस, विम्यावर बोनस नको असेल तर त्याविषयीचा अर्ज, मागील आरोग्य तक्रारींची माहिती, त्यावरील उपचार याविषयीची माहिती द्यावी लागते. नवीन कंपनी अर्ज आणि कागदपत्रांची शहानिशा करते. तसेच पोर्टिंग विनंती स्वीकारावी की नाकारावी याविषयीचा निर्णय घेते.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Uncategorized

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ
Uncategorized

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

March 8, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group