पाचोरा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात ब्राह्मणांची टिंगल करुन खिल्ली उडवत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पाचोरा तालुका पुरोहित संघातर्फे दि. २२ एप्रिल रोजी आ. अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आ. मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांची माफी मागावी तसेच त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
या मागणीचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे व पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अॅड. सचिन देशपांडे, खुशाल पाटील, प्रसाद डोल्हारे, उदय जोशी, अमोल पांडे, योगेश देशपांडे, महाविर गौड, राम शर्मा, चंद्रकांत जोशी, सुनिल मोघे, गजानन जोशी, हेमंत ओझा, वैभव जोशी, समाधान जोशी, प्रकाश जोशी, विनोद शर्मा, शामकांत सराफ, सजित देशपांडे, आशिष शर्मा, संदिप सराफ, सागर तांबोळी, अॅड. चंद्रकांत शर्मा, पं. जगदीश जोशी, हेमंत जोशी, प्रदिप कौडिंण्य, मिलिंद जोशी सह पाचोरा तालुका पुरोहित संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.