ट्रॅव्हल्स, आयशर आणि कारमध्ये ही दुर्घटना घडली. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ हा अपघात झाला. घटनेतील जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या सौंदाणे गावाजळ एका ट्रॅव्हल्सने कारला धडक दिली. चालकाला वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे शंभर फुटापेक्षा जास्त ट्रॅव्हल्ससोबत कारही फरफटत गेली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावरचे चित्र पाहणे असह्य होते. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी जखमींच्या मदतीसाठी सहकार्य केले.
अपघातामध्ये ट्रॅव्हल्सने कारला फरफटत नेले. मात्र, यात एक आयशर गाडी आली. तिलाही या वाहनांची धडक बसली. या आयशरमधून गायींची वाहतूक सुरू होती. त्यात अनेक गायी जखमी झाल्याचे समजते. त्यातील काही जखमी गायींना मुंगसे येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. या वेळी एका द्राक्षाच्या पिकअपचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे.
शहरातील क्षण फोटो स्टुडीओचे संचालक निलेश चव्हाण व लहान बंधू धनराज चव्हाण हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत नाशिक येथे शुटसाठी गेले होते. नाशिकचे काम आटोपून जळगावी निघाले होते.मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ ही घटना घडली. मयत धनराजच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.