जळगाव ः प्रतिनिधी
इंधन दरवाढ विरोधात युवासेनेतर्फे काल शहरात केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी राज्यात इंधनरवाढ विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत जळगावात युवासेनेतर्फे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
इंधन व महागाई वाढीचा निषेध करीत थाळी वाजवण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या सूचनेनुसार महानगर शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, राज्य विस्तारक किशोर भोसले, सहसचिव विराज कवडिया, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, पीयूष गांधी, राहुल पोदार, जितेंद्र बारी, अंकित कासार, सागर हिवराळे, गिरीश सपकाळे, यश सपकाळे, चेतन कापसे, तेजस दुसाने, ॲड अभिजित रंधे, निलेश जाधव, मयूर देशमुख, संतोष भंगाळे, लोकेश चौधरी, आकाश भंगाळे, वैभव पवार, पृथ्वीराज देशमुख, मयूर चौधरी, इम्रान तडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.