• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका चार वर्षीय चिमुकल्याला रात्रभर वर्गखोलीत कुलूपबंद अवस्थेत राहावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरकर लेआऊट परिसरातील अंगणवाडीत ही घटना घडली. संबंधित मुलगा बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेला होता. खेळता खेळता तो बाजूच्या खोलीत गेला आणि तिथेच झोपी गेला. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व खोल्यांची तपासणी न करता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले आणि घरी निघून गेले.

दरम्यान, मुलगा घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. स्थानिकांनी अपहरणाची भीती व्यक्त केल्याने पालकांनी तातडीने खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. संदीप पखाले यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करून रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच आसपासचे तलाव व नालेही पिंजून काढण्यात आले. तरीही मुलाचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पालकांची चिंता वाढत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस उपायुक्तांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार अंगणवाडीचे कुलूप उघडण्यात आले असता, मुलगा वर्गातच भीतीने थरथरत बसलेला आढळला. आईला पाहताच त्याने मिठी मारून हंबरडा फोडल्याचे हृदयद्रावक चित्र उपस्थितांनी पाहिले. घटनेनंतर पोलिसांनी अंगणवाडी प्रशासनाला कडक शब्दांत ताकीद दिली. शाळा बंद करण्यापूर्वी प्रत्येक खोलीची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भविष्यात अशा प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकवर्गातून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!
क्राईम

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

October 25, 2026
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !
क्राईम

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!
क्राईम

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

October 25, 2026
जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

October 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group