
चाळीसगाव : प्रतिनिधी
मानवी जीवनात अध्यात्माचे मोठे महत्व असून आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी आत्म शांतीसाठी अध्यात्म हाच पर्याय उरतो. त्यामुळे चाळीसगाव मतदारसंघात अध्यात्मिक उर्जाकेंद्र तयार व्हावीत यासाठी आमदार म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरात ब्रह्माकुमारीज् तथा वर्ल्ड रिन्युअल स्प्रिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाची निर्मिती केली जात असल्याचे मत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून उभे राहत असलेल्या शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. ध्यान आणि सेवाभाव केंद्रस्थानी ठेऊन काम करणाऱ्या ब्रह्माकुमारीज् ट्रस्टचे देखील त्यांनी कौतुक केले व हे पुण्याचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी मानले.
चाळीसगाव शहरातील करगाव रोड येथील गजाजन हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत होणाऱ्या या केंद्राचे बांधकाम, गेट, वाल कंपाऊंड, प्रदक्षिणा मार्ग व उद्यान सुशोभीकरण यासाठी जवळपास २० लक्ष रुपये आमदार निधी खर्च होणार आहे. सदर केंद्र हे शिवलिंग आकारात असून बाहेरून बारा ज्योतिर्लिंग प्रतिमा स्थापित केल्या जातील. त्यामुळे भाविकांना सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून आलेले ब्रह्माकुमारीज् जलगाव उपक्षेत्र निदेर्शिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत भूमिपूजन संपन्न झाले तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तद्नंतर आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारण्यात आला व केंद्रासाठी जागा देण्यास सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अमळनेर येथील विद्या दीदी, ब्रह्माकुमारी चालीसगाव संचालिका ब्रह्माकुमारी वंदनादीदी, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्करराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, के आर अण्णा पाटील, अमोल नानकर, भास्कर पाटील, कपिल पाटील, राकेश बोरसे, धनराज पाटील, मनोज गोसावी, भूषण पाटील, कां.रा.पाटील गुरुजी, ए.ता.खोडगे नाना, प्रकाश चौधरी, गुलाब चौधरी, रघुनाथ चौधरी, रमेश शिंपी, किशोर भाई, दिलीप कोठावदे, अशोक राजपूत, विवेक चौधरी, संदीप बेदमुथा, जितेंद्र वाघ, दिनेश चौधरी, शिवाजी पाटील, राहुल चौधरी, आबा सोनार, दिपक अमृतकर, अशोक गुंजाळ, चौधरी डॉक्टर, सुभाष येवले, प्रदीप राजपूत यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील ओम शांती परिवाराचे भक्त उपस्थित होते.




















