औरंगाबाद ः वृत्तसंस्था
मनसेचे नेते अमित ठाकरे आज सकाळीच औरंगाबाद येथे पोहचले आहेत. त्यांनी लागलीच सभास्थळाची पाहणी करून कर्णपूरामंदिरामध्ये जावून देवीचे दर्शन घेतले. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिरुपती येथील पद्मावती मंदिरात जावून दर्शन घेतले.
औरंगाबादमध्ये पोस्टर वॉर
शहरात मनसेच्या सभेसाठी एकच दिवस बाकी असतांना मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरात पोस्टर लावले आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो व ‘हिंदुजननायक व येत आहे भगवाधारी’ असा मजकूर आहे तर त्याच्याच बाजूला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरवर लिहले आहे की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो व ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरे होणे नाही’ असा मजकूर या पोस्टरवर लिहल्याने शिवसेना व मनसेत पोस्टर वॉर सुरु झाले आहे.