जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने डीपीला वाहन धडकल्याने त्या कंटेनरला विजेचा धक्का लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज सकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला एका कंटेनरवरील चालकाने आज गाडी मागे घेत असताना त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.यानंतर परिसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

विजेचा तीव्र धक्का लागून जगदीशसिंह यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने त्यांचा मृतदेह एका बाजूला केला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयत चालकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आला असून एमआयडीसी पोलिसात नोंद करणे सुरु आहे.