
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढत आहे. तसेच जळगाव शहरातही पार्टीचे संघटन मजबूत होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे काम मोठया दिमाखात सुरू असल्याने राज्यात व शहरात पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षमधून पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने येणाऱ्या काळात पार्टीला चांगले दिवस शहरात तरी येणार असल्याचे चित्र दिसू लागल्याने नुकतेच शहरातील काँगेसचे माजी पदाधिकरीसह कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक २८ रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयात माजी काँग्रेस शहर उपाध्यक्ष रईस कुरेशी व कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला. तसेच नाझीम कुरेशी, आरिफ खान, मोहनराव पाटील, दिनेश धनगर, मंगेश कोळी, विलास केदार, आदींनी जळगाव शहर जळगाव महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. यावेळी आनंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन जळगाव शहर मिडीया प्रवक्ता योगेश भोई यांनी काम पाहिले यावेळी उपस्थित कार्यकर्ते माधवराव जाधव. हेमराज सोनवणे. पवन खंबायत. दुर्गेश निंबाळकर. विक्रम कापडणीस. आदी कार्यकर्ता उपस्थित होते.





















