जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहराच्या वाहतूकीला घातक ठरणाऱ्या अजिंठा चौफुली, ईच्छादेवी, खोटेनगर, शिवकॉलनी येथे भुयारी मार्ग तसेच 7 हजार कोटी रुपये खर्चाच्या तळोदा- बऱ्हाणपूर महामार्गाची घोषणा केंद्रिय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जळगाव येथे केली.
चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्ग सहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, आ. गिरीश महाजन, महापौर जयश्री महाजन,आ. राजुमामा भोळे, आ. चंदुभाई पटेल, आ. संजय सावकारे,, आ. मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
जळगाव शहरातील जनतेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन शहरात नही तर्फे राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात असलेल्या अजिंठा चौफुली, ईच्छादेवी, खोटे नगर, शिवकॉलनी येथील सर्कल वाहतुकीसाठी धोकेदायक ठरत आहेत या पार्श्वभूमीवर ना. नितीन गडकरी यांनी येथून भुयारी मार्ग करणार असल्याची घोषणा केली. गिरणा नदीवरील पुलही नव्याने बांधण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या बरोबरच खान्देशाच्या विकासाला सहाय्य ठरणाऱ्या तळोदा- बऱ्हाणपूर या 7 हजार कोटी किमंतीच्या महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यातून जाणार आहे. बऱ्हाणपूर ते गुजरात असा मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात यांना जोडणारा 233 किमीचा हा महामार्ग आहे. यासाठी 3 हजार कोटीचे जमीन संपादनासाठी तर 5 हंजार कोटी बांधकामाचा खर्च आहे. याच्या भूमिपूजनासाठी सहा महिन्यांनी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव शहरातील विशेष मागणी असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने 5 किलोमीटरवर 1 हजार झाडे आहेत. ती झाडे न तोडता त्यांचे इतरत्न किंवा जवळच ट्रान्सप्लांन्ट करावे लागेल. त्यासाठी जिल्हाधिकारी व वनखात्याच्या परवानगीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हह्याला 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे रस्ते बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी वजन दिले. जिल्ह्याला आता पर्ययत 15 हजार कोटी खर्च केले आहेत 2024पर्यंत आणख 15 हजार कोटी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मागच्या वेळी जळगावसाठी घोषणा केल्या होत्या त्यात अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन आज कामे पुर्ण झाली 2014 पुर्वी 188 किमी महामार्ग होता. 2014 नंतर 409 किमीचा महामार्ग घोषीत केला. म्हणजे 216 टक्के वाढ झाली.
सर्व्हिस रोडबाबत नाराजी
जळगाव शहरातील महामार्गावर असलेल्या सर्व्हिस रोड चांगले बांधण्यात आले नसल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या रस्त्यांवरील अतिक्रमण काढायला हवेत अशा सूचना त्यांनी केल्या.
