पाचोरा : प्रतिनीधी
येथील किराणा दुकानदारांने सोशल मिडियावर मसाला विक्री करणार्या पोस्टवर संपर्क साधुन २० हजार रूपयांच्या मालाची आॅर्डर केली. मात्र १५ दिवस उलटुनही माल न आल्याने संबंधितास संपर्क साधला असता त्याने ५ हजार रूपये परत केले. मात्र माल दिलाच नाही. आपली फसगत झाली हे लक्षात येताच सदर दुकानदाराने पाचोरा पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांकडुन मिळालेली माहीती अशी की, शहरातील मराठे शाॅपिंग काॅम्पलेस मधील होलसेल किराणा दुकानाचे गणेश केसवाणी यांचा पुतन्या प्रिंस केसवाणी याने फेसबुक गृप ब्लॅकपेपर ट्रेडिंग मार्केटवर काही दिवसांपुर्वी मसाले विक्री बाबत जाहिरात वाचली. त्यानंतर प्रिन्स यास ६३५५०३९७९७ या क्रमांकावरून फोन आला व तुम्हाला मसाले हवे आहेत का? अशी विचारणा केली. बालविर इंटरप्राईज १८ गोडावून लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर, जेटपुर हायवे, साबलपुर ,जुनागड हा आमचा पत्ता असुन बॅक ऑफ बडोदा या बॅकेच्या ५८६८०१००००२६४ या क्रमांकावर पैसे पाठवून मालाची ऑर्डर करण्याचे सांगातले. प्रिन्स याने सदर इसमास ९ हजार किंमतीचे १८० रूपये किलो दराने ५० किलो जिरे, ११ हजार ५०० रूपये किंमतीचे ४६० किलो दराने २५ किलो मिरे असे एकुण २० हजार ५०० रूपयांची ऑर्डर दिली. तसेच पेमेंटही पाठउन दिले.
ऑर्डर टाकुन बराच कालावधी झाला मात्र माल आला नाही. म्हणुन फोन करून चौकशी केली असता सुरूवातिला उडवा उडवीची उत्तरे मिळाली. नंतर वाद वाढत गेला. सदर इसमाने एकदा ४ हजार ९९० रूपये खात्यावर परत केले मात्र उर्वरित पैसे अथवा माल न पाठवल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच प्रिन्सचे काका गणेश केसवाणी यांनी पाचोरा पोलिसामध्ये तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅस्टेबल विनोद पाटील हे तपास करित आहेत.
