जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्यांवर सहाय्यक अधिक्षकांच्या पथकासोबत एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने फातेमा नगरात छापा टाकला. पथकाने केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोबत मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर असे कि, शहरातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी आयेशा किराणाजवळ छापा टाकला.
पथकाने केलेल्या कारवाईत इम्रान अमीन खान वय-४० रा.चिखली ह.मु.फातेमा नगर, वसीम सैय्यद कामरोद्दीन वय-३८, जावेद नबी शेख वय-३० रा.फातेमा नगर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. जळगावात यंदाच्या आयपीएलमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.




















