चाळीसगाव : प्रतिनिधी
सहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात ६ वर्षीय बालिका ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या चिमुकली ही आपल्या घराच्या समोरील खेळत होती. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा संशयित आरोपी काल्या ऊर्फ फारुक शेख फकीरा शेख याने बालिकेला बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत बालिकेच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी काल्या उर्फ शेठ फकीरा शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.