यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डांभुर्णी येथील महिलेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त कि, यावल तालुकयातील डांभुर्णी येथील रहिवासी सुमनबाई विलास भालेराव (वय-४५) या आपल्या कुटुंबीयांसह रहिवासाला आहे. रविवार १७ एप्रिल रोजी सुमनबाई भालेराव यांनी घरात कोणी नसताना दुपारी पंख्याच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान नातेवाईक हे घरी आल्यानंतर त्यांना सुमनाबाई यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजिज अमित शेख करीत आहे.