
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकी चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी ३१ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापूरा परिसरातील बिलाल चौकातील रहिवासी आसीफ अली बशरत अली (वय-३८) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आसीफ हे आपल्या चारचाकी वाहनाने रविवारी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनीकडून शहरात येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून कारचालक आसीफ अली बशरत अली हे किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून ट्रकचालकाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक मुकेशकुमार ललन यादव रा. भोजपूर, बिहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.





















