जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – नशिराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणार्या अवजड वाहनाने दुचाकीला उडविल्याने यावरील दोन्ही जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीकच्या माऊली पेट्रोल पंपाजवळ २० रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच ०६ बीई १७६९ या वाहनाने एमएच १९ एएक्स २४६० या क्रमांकाच्या दुचाकीला उडविले. यात भूषण रमेश पाटील ( वय ४२, रा. फैजपूर, ता. यावल) हे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड ( वय ४५, रा. मस्कावद, ता. रावेर) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, या अपघातात मयत झालेले दोघे जण आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. जळगाव येथील काम आटोपून घरी जात असतांनाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.