
जळगाव : प्रतिनिधी
अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे ३०० राख्या पाठविण्यात आल्या.
या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगावतर्फे पाठवण्यात आल्या. याप्रसंगी माननीय श्री संजय महाजन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व माननीय श्री आनंद परदेशी वरिष्ठ लिपिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील, किमया पाटील, नूतन तासखेडकर, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, भाग्यश्री महाजन, या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.




















