जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे आज सकाळी 11.30 वा. जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विजय माने, सागर सपके, नरेंद्र जाधव, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, राजेंद्र सोनवणे, जगन जाधव, प्रशांत मांडोळे, गोविंद महाले यांचीही उपस्थिती होती.
यावेळी क्रिडा अधिकारी दिक्षीत यांचे स्वागत आरसी गृपचे राहुल सुर्यवंशी व चेतन महाले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी ललित सुर्यवंशी, यादव महाले, बाळा सोनवणे, सुनिल चौधरी, विवेक चौधरी, रोहित वाघ यांनी परिश्रम घेतले.




















