जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटनजीक पहाटे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपासाअंती हत्या झालेला मयत तरुण हा अनिकेत गणेश गायकवाड रा.राजमालती नगर जळगाव असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील मयत तरुण हा मालधक्क्यावर हमाली करत असल्याचे समजते. त्याच्याच एखाद्या सहका-याने त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याची हत्या कुणी व का केली याचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मयताच्या हातातील कड्यावरुन त्याच्या नातेवाईकांनी त्याला ओळखले. दगडाने ठेचल्याने त्याची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच पुढील कारवाईला सुरुवात केली. दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.