फैजपूर : प्रतिनिधी
दि.22/03/2022 रोजी ‘जागतिक जल दिन’ निमित्त धनाजी नाना महाविद्यालयातील तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी सावदा फैजपूर औद्योगिक वसाहत येथील दत्त ठिबक या ठिबक उद्योग प्रकल्पाला भेट दिली, ही भेट शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांमधील उद्योजगता गुणांचा विकास व्हावा या दृष्टीने महत्वाची आहे, याप्रसंगी दत्त ठिंबक चे व्यवस्थापक श्री प्रशांत राऊत यांनी ठिबक सिंचन तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त अशी माहिती दिली तसेच आफ्रिकन देशांमध्ये निर्यात होणाऱ्या सिंचन उत्पादनांविषयी माहिती दिली. तसेच दत्त ठिबकचे संचालक श्री युगंधर पवार यांनी विद्यार्थ्यांना ठिबक सिंचनाचे फायदे सांगत असतांना शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये होणारी भरघोस वाढ व सोबतच पाण्याची बचत होऊन इतर गोष्टींत शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याचे महत्व पटवून दिले, विद्यार्थ्यांना आद्योगिक क्षेत्रात स्वावलंबी राहून करियर घडविण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. व जल हेच जीवन आहे म्हणून आपण पाण्याची जास्तीतजास्त बचत केली पाहिजे, सिंचन उद्योगाच्या माध्यमातून आपण ही एक प्रकारे पाणी आडवा पाणी जिरवा* या मिशनला हातभार लावत आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो असे मत युगंधार पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. के. पाटील ,उपप्राचार्य प्रा. ए. जी. सरोदे, उप प्राचार्य डी. बी. तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच प्रा.डॉ. हरिष तळेले , प्रा. डॉ.राकेश तळेले , प्रा.डॉ.योगेश तायडे, प्रा. विकास वाघूळदे ,प्रा. पल्लवी भंगाळे, प्रा. अचल भोंगे , प्रा.डॉ. एम. बी. पाटील, प्रा. निलेश पाटील, प्रा. पूजा महाजन प्रा. अश्विनी पारधी व प्रा वर्षा भंगाळे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
