भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ रेल्वे स्टेशन येथे जागतिक हिवताप दिना निमित्त जनजागरण मोहीमेचे दि २५ एप्रिल रोजी प्रा. संजय मोरे, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्व शक्ती सेना युवक जळगाव जिल्हा अध्यक्ष मयुर वसंत कोळी हे होते. त्या प्रसंगी प्रा.संजय मोरे यांचे सुनील महाजन आरोग्य सहाय्यक यांनी बुके देऊन स्वागत केले. तर मयुर कोळी याचे स्वागत प्रशांत चौधरी यांनी केले.
त्या प्रसंगी प्रा संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर मोहीम ७ दिवस राबविण्यात येणार असून, या मोहिमेत ज्ञानदेव चोपडे, प्रशांत चौधरी, भानुदास चौधरी, काझी आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला डॉ.महेंद्र सुरवाडे कृष्णा सावळे, राजेश कोळी, आकाश कोळी, प्रा.सुनील तायडे, सोनु सूर्यवंशी, विनोद ठाकरे, विनोद कोळी, प्रदीप पानपाटील, विकास सपकाळे, मेहबूब खान, रशीद खान यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौधरी यांनी केले तर आभार प्रशांत चौधरी यांनी मानले.