जामनेर : प्रतिनिधी
शहरातील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या नेतृत्वा खालील सहकार पॅनेलला बहुमत मिळाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने त्यांच्याच विरोधात मविआच्या नेत्यांनी शेतकरी सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून लढत . दिली.बऱ्याच वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत होती. परंतु यावर्षी देखील सदर निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तसा प्रयन्त देखील केला गेला. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना नेत्यांनी शेतकरी सहकार बचाव पॅनल दिल्याने निवडणूक चुरशीची झाली.
सहकार सर्वसाधारण मतदारसंघ शंकर राजपूत (३३२), राजेंद्र भोईटे (३२६), प्रदीप गायके (३२२), पांडुरंग माळी (३२०), देवराम चौधरी (३१४), विजय सोनावणे (३१०), ज्ञानेश्वर माळी (३०८), जावेद अब्दुल वाहेद (२८२) महिला राखीव डॉ स्नेहांकित लोखंडे (३२८), माधुरी लखोटे(३४०) भटक्या विमुक्त जाती जमाती गोविंदा धनगर (३४२). ओबीसी गोपाळ पाटील व अनुसूचित जाती जमाती जगन्नाथ सुरळकर (दोन्ही बिनविरोध) यांनी विजय मिळवला.
सकाळी मतदानास जि.प. मराठी मुलांची शाळेत सुरुवात झाली दुपारी चार पर्यंत मतदान झाले. मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून व फटाके फोडून नगरपालिका कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. आमदार महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन, छगन झाल्टे, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे, सुहास पाटील, स्वीय सहाय्यक दीपक तायडे आदी सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.