जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील कोळी समाज बांधवांना टोकरे कोळी समाज प्रमाण पत्र मिळण्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तथा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, आमदार सुरेश भोळे, प्रल्हाद सोनवणे, मयुर कोळी उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये १९७६ पासुन ३०% लोकांना टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळालेले असुन ७०% लोकांना टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना नोकरी व इतर शासकीय स्वरूपाच्या लाभापासुन वंचित रहावे लागत आहे. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक मुद्दा क्रमांक ९- वैधता रि ओपन करणे, पुर्ण चौकशी करणे, मुद्दा क्रमांक १२ – अवैद्य जात प्रमाणपत्र पडताळणी अवैद्य ठरल्यास कार्यवाहीची काल मर्यादा असावी, केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने पुर्वी प्रमाणे समाज कल्याण विभागा मध्ये विलीन करावा, महाराष्ट्र शासनाने दिनाक ७ जुन २०२१ च्या आदिवासी विकास विभागाचा राज्यातील १ कोटी आदिवासींना नामशेष करणारा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा, वेगळे आदिवासी मंत्रालय किंवा वेगळी समिती स्थापन करावी, या मागण्या निवेदनात नमूद आहेत. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील १९७६ नंतर अनुसूचित जमातीच्या पात्रतेला २ कोटी आदिवासींचा विरोध आहे.
दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश न्यायमूर्ती गंगापूरवाला, न्यायमूर्ती आर.एन. लढ्ढा यांनी रिट रीपीटीशन नंबर ८८२९/२०२१ टोकरे जात प्रमाणपत्र बामनोद तालुका यावल जिल्हा जळगाव येथील सुनील कडु कोळी यांन तसेच धनश्री रवींद्र कोळीयांना मा. हाय कोर्ट यांनी फैजपूर प्रांताधिकारी यांना आदेश दिल्या नुसार प्रमाणपत्र मिळाले आहे. तरी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकांना अनुसूचित जमाती टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी प्रा.संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव व प्रवीण धुदले यांनी ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी मा. रामनाथ कोविंद राष्ट्रपती दिल्ली यांच्याकडे केली होती. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जळगाव दौऱ्या दरम्यान याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा.संजय मोरे, प्रल्हाद बोंडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष माया मोरे, संगीता सोनवणे, मयुर कोळी, कृष्णा सावळे, सुनीता कोळी, गजानन काडेले, धनराज कोळी, उमेश तायडे, दीपक तायडे, प्रा. सुनील तायडे, प्रा.दिलीप सोनवणे, डॉ. महेंद्र सुरवाडे, राजेंद्र पाटील, मनोज सोनार, प्रभाकर तायडे, शाम सोनवणे, प्रमोद वाणी, संदीप वाणी, राजु वाणी, गुलाब सपकाळे, युवराज सपकाळे, सचिन सुरवाडे, विनोद कोळी, विनोद ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
