
चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील अल्पवयीन मुलगी क्लास आटोपून दुचाकीने घरी जात असताना धुळेकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात तक्रार नोदविण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका क्लास संपल्यानंतर शिवदर्शन कॉलनीतील रहिवासी कु.सायली भागवत हडपे (वय १५) ही मुलगा शुक्रवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास क्लास संपल्यावर दुचाकी क्र.जी.जे.०६.बी.क्यू.०४५४ याने घरी जात असताना धुळे महामार्गावर भरधाव क्रं.एम.एच.४६. एफ.३२३२ या ट्रकने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मुलीचा उजवा हात व पाय ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. यावेळी काही नागरिकांनी तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. तेथील डॉक्टरांनी मुलीला नाशिक येथे हलविण्यास सांगितले परिवारातील काही सदस्य या मुलीला नाशिक येथे घेवून जात असताना या मुलीचे रस्त्यामध्ये प्राणज्योत मालवली. या घटनेने चाळीसगावात एकच खळबळ झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहेत.




















