रावेर : प्रतिनिधी
शहरातील नाईक कॉलेजजवळ ट्रकची व मोटरसायकल समोरा-समोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजजवळ मध्य प्रदेशकडून ट्रक नंबर MP 06 HC 1605 रावेर मार्गे जळगावच्या दिशेने बटाटे घेऊन जात होता. तर रावेर कडून MH 19 DR 8335 या मोटरसायकलने गोविंदा महाजन अटवाडेच्या दिशेने जात होता. या दरम्यान मोटरसायकल व ट्रकची समोरा-समोर धकड झाली. यात गोविंदा महाजन याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ट्रक रावेर पोलिस स्टेशनला जमा झाला आहे.जखमी मोटरसायकलस्वाराला पुढील उपाचारासाठी जळगाव येथे हलवले आहे.