मुबंई : वृत्तसंस्था
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून, ते काल संध्याकाळापासून नॉट रिचेबल आहेत. निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिंदे हे नाराज असल्याचे कळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत वर्षांवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह रात्री पहिल्यांदा अहमदाबादमध्ये दाखल झाले. येथून ते आपल्या सहकार्यांसह सूरत येथील ला मेरेडीयन या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. तर या हॉटेलच्या भोवती अतिशय कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री या स्थितीवर नजर ठेवून आहेत.
सूरत, नवसारी आदी भागात खान्देशमधील लोक मोठ्या संख्येने आहेत. यात नवसारी येथील खासदार हे सी. आर. पाटील हे असून ते मूळचे भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचाराची जबाबदारी सोपविण्यात आली असून ते ऑपरेशन लोटसमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री शिंदे नॉटरिचेबल
मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील गुजरातला आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल 13 आमदार असल्याची माहिती आहे. काल संध्याकाळपासून महाविकास आघाडीतील अनेक जण शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते फोन घेत नाहीये. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. व्युहरचना जेव्हा आखण्यात येत होती तेव्हा शिंदेना साईडलाईन करण्यात आले होते.
शिवसेनेच्या उमेदवारांना २६ मते
सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार काठावर विजयी आहे झाले आहेत. शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्षांचे मतं फुटल्याचे काल स्पष्ट झाले. शिवसेनेचे उमेदवार आशमा पाडवी आणि सचिन आहिर यांना प्रत्येकी 26 मते मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षांवर आज बैठक बोलावली आहे.
संजय राऊतांना दिल्ली दौरा रद्द
शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज असल्याने तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक असल्याने त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.
आज बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. राज्य सभेनंतर विधान परिषदेतही झालेल्या दगा फटकीनंतर ही बैठक बोलण्यात आल्याचे कळते.