जळगाव : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांना एफएएलएस – रोबोटिक सर्जरीत फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ.जोशी हे खान्देशातून ही फेलोशिप मिळवणारे पहिलेच सर्जन आहेत.
इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेशियल इंडो – सर्जन्सद्वारे गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांनी अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरीतील एफएएलएस – रोबोटिक सर्जरीत फेलोशिप प्रदान करण्यात आली.
याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.मिलींद जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आदिंनीही अभिनंदन केले.
तब्बल ९ हजार लॅप्रोस्कोपी तज्ञ सदस्य असलेल्या या संस्थे तर्फे ही फेलोशिप दिली जाते. रोबोटिक सर्जरी या विषयामध्ये पहिल्यांदा ही दिल्या गेली आहे. यासाठी काही व्हायवा, सेमिनार्समध्ये सहभागी व्हावे लागते, यंदाच्यावर्षी डॉ.मिलींद जोशी यांना फेलोशिप मिळाली असून खान्देशातून पहिले सर्जन असल्याचा बहुमान डॉ.जोशी यांना प्रदान झाला आहे.
या फेलोशिप दरम्यान रोबोटवर प्रशिक्षण दिले जाते. याचा फायदा असा की, लॅप्रोस्कोपीत जे शक्य नाही किंवा जे खुप कठीण आहे अशा गोष्टी रोबोटिक सर्जरीतून शक्य होतात आणि त्याचा चांगला लाभ रुग्णांना होतो. लॅप्रोस्कोपीचा पुढचा टप्पा म्हणजे रोबोटिक सर्जरी हा आहे. भविष्यात असे रोबोट आपल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ.उल्हास पाटील सर यांच्या माध्यमातून येतील, अशी मी आशा करतो, या तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्ह्यातील सर्जन्स तसेच रुग्णांना निश्चितच फायदा होईल, असे पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांनी सांगितले.