जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमधील एका तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे.
सविस्तर वृत्त असे, शहरातून जवळच असलेल्या एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये अयोध्या नगरातील लक्ष्मण काकडे यांची एमआयडीसीत कंपनी आहे. कामगार दीलशान आलम हा रचना कॉलनीत रहिवासास आहे. हा कामगार काकडे यांच्या कंपनीतील मजूर दुसर्या कंपनीत कामाला लावत असल्याची माहिती काकडे बंधूंना समजली. ११ रोजी अरुण काकडे यांनी जी सेक्टरमध्ये दीलशान आलम याला जाब विचारला असता. त्याने अरुण व लक्ष्मण काकडे बंधूंना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी १२ एप्रिल रोजी अरुण काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलशान आलम याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.




















