यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या गाडर्यो गावातील २४ वर्षीय तरुर्णीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गाडऱ्या शिवारातील रहिवासी फुगली भाया बारेला असे मयत तरुणीचे नाव आहे. फुगली भाया बारेला वय २४ ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह गाडऱ्या येथे वास्तव्यास होती . नेहमीप्रमाणे गाडया शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी ९ वाजता कुटुंबियांसह तूर कापण्यासाठी शेतात गेली असता तिला विषारी सापाने दंश केल्याने जागीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच भरत बारेला, पोलिस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस पाटील तेरसिंग बारेला यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फौजदार नेताजी वंजारी करीत आहे