जळगाव ः प्रतिनिधी
शहरात आज दि.3 रोजी सकाळी तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. त्यानंतर हा तरूण कासमवाडीतील सागर वासुदेव पाटील हा आढळून आला. या तरूणाची मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञातांनी डोक्यावर दगडाने ठेचून खून उघडकीस आला होता. या खुनातील आरोपी पकडण्याचे जोखमीचे काम पोलिस पथकावर आले होते.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील मासुमवाडी येथे आज सकाळी तरूणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळी तत्काळ पोलिस पथक दाखल झाले होते. त्यानंतर संशयिताची शोध मोहिम जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अमळनेर येथून संशयित आरोपी आरीफशहा अयुब शहा(रा.छोला सालार नगर) व जुबेर शेख भिका सिकलिगर(रा.मासुमवाडी) असे अटक केलेल्याची नावे आहेत.