
जामनेर : प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे की दि.५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर गटविकास अधिकारी यांना उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते. ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनात शिक्षण खात्यातील काही त्रुटी व समस्येवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
ज्यात तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्यावतीने कोरोनाच्या परिस्थितीत आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन किट खरेदी करून प्रत्येक केंद्राला वाटप करण्याचे ठरले होते मात्र कोरोना सदृश परिस्थिती निवारल्यामूळे ऑक्सिजन किट ची आरोग्य केंद्रांना आवश्यकता नसल्याचे केंद्राने मत मांडले असता ज्या उद्देशाने पैसे जमा करण्यात आले होते ते प्रयोजन पूर्ण होत नसल्याने मनसेच्या मागणी नुसार शिक्षक यांचे पैसे शिक्षकांना परत करण्यात यावे म्हणून शिक्षक संघटनेचे प्रमुख यांच्याकडे पैसे परत करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील काही खेड्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देण्यात आले होते मात्र मनसेच्या मागणी नुसार सर्व शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेवर पूर्ववत करण्यात आले असून सर्व शिक्षक याना त्यांच्या मूळ शाळेवर तात्काळ पाठवण्यात येणार आहे .
त्याचप्रमाणे तालुक्यातील काही केंद्रप्रमुख हे शासकीय कामकाजाच्या दृष्टीने प्रभारी नेमणुका केल्या आहे तसेच पहुर येथील केंद्र प्रमुख यांच्याबाबत केंद्रातील शिक्षक , मुख्याध्यापक यांच्यात प्रचंड असंतोष असल्याचे मनसे च्या मागणीनंतर लक्षात आले आहे मात्र संबंधित केंद्रप्रमुख यांना बदली करण्यात यावी यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला आहे मात्र काल च शिक्षकांच्या सयुक्तिक व सामंजस्याने शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यातील वाद मिटवून त्यांचा जबाब लिहून ताकीद देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तोंडापुर येथील शिष्यवृत्ती प्रकरणात मुख्याध्यापक यांना निलंबित केले असल्याने संबंधित मुख्याध्यापक हजर होताच शिष्यवृत्ती रक्कम वसूल करून लाभार्थी विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मनसे चे अशोक पाटील यांना देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 12 जुलै रोजी पंचायत समितीच्या दालनात मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील उपोषणाला बसणार होते मात्र उपोषणापूर्वीच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी व उपोषण कर्ते अशोक पाटील यांची निवेदनावर चर्चा करण्यात आली व निवेदनातील मागण्यांवर चौकशी व विचार विनिमय करून संबंधित मागण्या सामंजस्याने सोडवण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील , मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी , मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील , मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , मनसे तालुका उपाध्यक्ष किरण अहिरे , नाना शिंदे , दत्ता पाटील , सागर जोशी , मनविसे तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , योगेश जोशी , किरण सौदागर , अश्विन कोकाटे , जगदीश कुरकुरे , अरुण भोसले महाराज , राम भोसले , लोकेश जोशी , मुकेश जाधव , हर्षल पाटील , सुरेश पवार , मयूर कोळी , अनिल मोरे , वाल्मिक कोळी , देवानंद कोळी , नारायण पाटील , शुभम चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




















