जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे झालेल्या दोन दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये तरूणाचा मृत्यू झाला असून एक जणाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे २७ रोजी रात्री दोन दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. यात पिंपळगाव गोलाईत येथील तरूण सुशांत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय पाटील हा पाळधी येथील तरूण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर अपघातातील शेख अर्शद शेख हरूण, समीर शेख जाकीर व अजय पाटील हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जळगावला हलवले आहे. यातील तालुक्यातील पाळधी येथील अजय पाटील या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. यातील जखमींवर जळगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.