
जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हिवरखेड येथील रोडवर उभा असलेल्या अल्पवयीन मुलाला भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातून आकाश दावत हे उदरनिर्वाहसाठी जामनेर येथील गोंडखेव शेत शिवारातील स्टोन क्रेशर मशीन येथे रहात होते. त्यांचा १४ वर्षीय मुलगा शिवकास आकाश दावत (वय-१४) वास्तव्याला होता. ६ जुलै बुधवार रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हिवरखेडा रोडवरील रस्त्यावर खेळत असतांना समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर (एमएच १९ झेड २९१२) ने मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा जागीच ठार झाला. याबाबत डंपर चालक नारायण नथ्थू चौधरी रा. गोंडखेल ता. जामनेर याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बिऱ्हाडे करीत आहे.




















