अमळनेर : प्रतिनिधी
शिरूड येथे माहेरी राहत असलेल्या महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.
दि. १७ जूनच्या मध्यरात्री ही घटना घडली. वडील वसंत पाटील हे सकाळी उठल्यावर वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना आपली मुलगी दोरीने गळफास घेतलेल्या स्वरूपात आढळली व नातू झोपलेल्या स्थितीत आढळला. दरम्यान दोघे मृत स्थितीत आढळल्याने त्यांनी आरडाओरड केली.
सदर विवाहित महिला काही वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे शिरूड येथे माहेरी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. नंदुरबार जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह झाला होता. पूर्वी सोनवणे या विवाहितेचे नाव असून वृषांत असे चिमुकल्याचे नाव आहे.
दरम्यान संबंधित महिलेने चिठ्ठी देखील लिहिली असल्याचे समजते. आपल्या पाच वर्षीय पोटाच्या गोळ्याला संपवल्या नंतर स्वतःला संपवून घेणाऱ्या या आईला अशी काय अडचण असेल हा प्रश्न उपस्थित होतो.