जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शहर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अतंरावर असलेल्या गांधी मार्केटमध्ये एक दुकान तर टॉवर चौकाजवळ असलेल्या दत्त मंदिरात देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन चोऱ्या झाल्याचे उघड झाले आहे.
शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अतंरावर असलेले टॉवर चौकाजवळ असलेल्या शिवराम लॉज समोरील दत्त मंदिरात शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास एक भुरटा चोर आला होता. मंदिरातील तांब्या आणि दिवा चोरण्याच्या उद्देशाने चोरट्याने मंदिराचा काच फोडण्यासाठी मोठा दगड फेकला. परिसरात असलेल्या काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने धूम ठोकली. तर रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील संजय भोई यांचे महात्मा गांधी मार्केटला फंकी बॉईज मेन्स वेअर नावाने पहिल्या मजल्यावरील कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ८.४५ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना आपले दुकान फोडल्याचे समजले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवत आत प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी अंदाजे ५७ शर्ट आणि ५३ पॅन्ट चोरून नेल्याचा अंदाज आहे.