दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानात राजकीय भूकंप होण्याची शक्यताय. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. 8 मार्चला विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. आता क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत करतायेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला असून खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत.
24 खासदार बंडखोर
इम्रान खान यांच्या सरकारवर देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला त्यांचं सरकार जबाबदरा असल्याचा आरोप केलाय. 24 खासदारांनी बंड केल्याने इम्रान सरकार अल्पमतात आहे. इस्लामाबादमधील रॅलीत सहभागी होण्यासाठी त्यांचे हजारो समर्थक परेड ग्राऊंडवर पोहोचले आहेत. खासगी माध्यमांना रॅलीतून हाकलून लावले आहे.तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या सरकारमधील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याची माहिती आहे.




















