मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील अंतुर्लीचा रहिवासी ३१ वर्षीय तरूणाचा पुर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पंकज शांताराम धायले (वय-३१) रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खामखेडा शिवारातील पुर्णा नदीपात्रात पंकजने उडी घेतली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तरूणांच्या मदतीने तरूणाला पाण्याबाहेर काढून तातडीने मुक्ताईनगर शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.