जळगाव ः प्रतिनिधी
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दि.19 रोजी सांगली येथे केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज सकाळी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव जिल्हा पुरोहित मंडळ यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा पुरोहित मंडळातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी पार्टीचे आ.अमोल मिटकरी यांनी दि.19 एप्रिल रोजी कार्यक्रमात बोलतांना हिंदू धर्माच्या विवाह पध्दती बदल चुकीचे मंत्र म्हणून पुरोहित वर्गाची टिंगल टवाळकी केल्याने अकलेचे तारे तोडले व त्या अज्ञानी माणसाच्या अशा वक्तव्यावर राज्याचे सामाजिक मंत्री मुंडे व जयंत पाटील यांनी खळखळून दाद दिल्याबद्दल या नेत्यांवर कारवाई व्हावी म्हणून जिल्ह्यातील पुरोहित मंडळोन आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याप्रसंगी अध्यक्ष भुषण मुळे, सचिव अजय जोशी, पुरुषौत्तम शुक्ल, विजय जोशी, अविकुमार जोशी, दिपक भट, योगेश्वर जोशी, विवेक जोशी, देवेंद्र काळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















