चंदीगड : वृत्तसंस्था
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात इतर दोघे जखमी झाले आहेत. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. विशेष म्हणजे सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसे वाला यांचा सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.
हे राम…. 🙁
Punjabi singer and Congress leader Sidhu Moose Wala shot dead https://t.co/1IUY6e9cSw via @IndianExpress— Alka Lamba 🇮🇳 (@LambaAlka) May 29, 2022
मिळालेल्या माहितीनुसार गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाला असून या हल्ल्यात त्यांचे दोन मित्र जखमी झाले आहेत. मुसा वाला यांनी २०२२ साली काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना आम आदमी पक्षाचे डॉ.विजय सिंग यांनी पराभूत केले होते.
सिद्धू मुसे वाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवास केला होता. काँग्रेसने त्यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मानसा मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत मानसा यांचा ६३,३२३ मतांच्या फरकांनी पराभव केला होता. दरम्यान, मुसे वाला यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेते रोष व्यक्त करत आहेत. तसेच भाजपनेदेखील पंजाबमधील आप सरकारवर टीका केली आहे.
