मुंबई :वृत्तसंस्था
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे पसरवली आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती सतत आपले नवनवीन फोटो-व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. नुकतंच प्राजक्ताने एक जबरदस्त फोटोशूट केले असून, तिचा हा साडी लूक फॅन्सला प्रचंड आवडला आहे. नितळ त्वचा, नशिले डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेली प्राजक्ता लाखो दिलों की धड़कन बन आहे. तिच्या या फोटोनंतर असंख्य चाहत्यांच्या कमेंटस् येत आहेत. तसेच लाइक्सचा अक्षरशः पाउस पडत आहे.





















