वर्धा : प्रेमात वाहून जात आपण काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तीक मुद्दा आहे. काही वेळा प्रेम केलं तर संघर्षही अटळ असतो. प्रेमाला विरोध म्हणजे जीवन संपविणे नाही तर संघर्ष करुन लढायला हवं, हे सांगण्यामागचं कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील बेला गावातील रहिवासी अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकरासह वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या कुर्ला गावातील एका शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचा एकच उद्देश ते म्हणजे प्रेमाला असलेला घरच्यांचा विरोध. अल्पवयीन मुली सह तिचा प्रियकर यापूर्वीही पळून गेले होते. त्यामुळे मुलीच्या घरच्यांना महेशवरच संशय असल्याने महेशने मुलीला पळवून नेल्याची तक्रार बेला पोलिसात दाखल केली होती. अखेर दोघांचेही मृतदेहच विहिरीत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ माजली.
कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या
महेश शालिक ठाकरे (26) आणि त्याची 15 वर्षीय प्रेयसी दोघेही नागपूरमधील बेला येथील रहिवासी आहेत. अल्पवयीन मुलगी घरातून कुणालाही न सांगता 26 रोजी घरातून निघून गेली होती. ती मृतक महेश ठाकरे याच्यासोबत गेल्याचा घरच्यांना संशय होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी बेला पोलिसात याबाबत पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. घरच्यांना ही बाब माहिती झाल्याने आता आपल्याला घरचे वेगळे करणार ही भिती दोघांच्याही मनात होती.