
फैजपूर :प्रतिनिधी
निर्मला अवसरमल यांचे निवासस्थानी वर्षावास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्ये प्रतीमेला निर्मला अवसरमल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बौध्दाचार्य बी.डी महाले सर यांनी बुद्ध वंदना व परित्राण पाठ घेतले,व तदनंतर समाजसेवक तथा भावी नगरसेवक अशोक भालेराव यांनी वर्षावास बद्दल माहिती देवुन कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा दिल्या . उपस्थितीत बौद्ध उपासक,उपासीका म्हणून सुमित्रा गिरधर इंगळे,लता सदानंद मेंढे, मेघना शैलेंद्र अवसरमल, वाघोदे बाई, बौद्ध उपासक विजय कुमार तायडे इंजिनिअर, शैलेंद्र अवसरमल, राम अडकमोल देविदास साळुके, देविदास वाघोदे यांच्या समोर निर्मला अवसरमल यांनी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म ग्रंथ वाचायला सुरुवात केली.
वाचनाचे पहिले पुष्प गुंफन आता आजपासून पोर्णिमे पर्यंत सदर या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात येवून दररोज ज्यास्तीजास्त महिलांनी उपस्थितीत देवुन बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाचे कार्यक्रमात सामील होवून सामाजीक प्रभोदनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















