
जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, रोशन मनोहर कोंगळे (वय-२०) रा. झोडगा जि.बुलढाणा हा तरूण एकटा बुधवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भुसावळ कडून जळगावकडे येत असतांना नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे भुसावळ मार्गे जाणारी भरधाव बस (एमएच ४० एक्यू ६२७०) ने जोरदार धडक दिली. यात अपघातात रोशन कोंगळे हा तरूण जागीच ठार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















