मलकापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाचपांडे पेट्रोल पंपानजीक भरधाव एसटी बसने दुचाकीस जबर धडक दिल्याने या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जख्मी झाल्याची घटना दुपारी बारा वाजेदरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, ग्राम झोडगा येथील जगदीश विनायक चव्हाण (वय २१) व वैभव मंगलसिंग चव्हाण (वय १६) हे दोघे दुचाकी क्रं.MH २८ AA ७२०८ ने मलकापुरवरुन झोडगा येथे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रं सहावर एसटी बसने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार वैभव मंगलसिंग चव्हाण हा जागीच ठार झाला. तर जगदीश चव्हाण हा गंभीर जख्मी झाला घटनास्थळावरून एसटी बस चालकाने पोबारा केला. येथील काही नागरीकांच्या मदतीने जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मयत वैभव मंगलसिंग चव्हाण यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ॲड.हरीश रावळ, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.
