चाळीसगाव : प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून भुसावळ पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती.भाविकांसाठी रेल्वेची सोय व्हावी. याकरीता खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने आज ही गाडी सोडण्यात आली होती. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या आषाढी रेल्वे गाडीचे स्वागत आज चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. संपदाताई पाटील तसेच कार्यकर्त्यांचे उपस्थित करण्यात आले.
चाळीसगाव स्टेशन मास्तर देसले व त्यांचे सहकारी उपस्थित होते. याप्रसंगी चालक के जे तायडे व चालक दीपक कुशवाह यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन संपदाताई पाटील यांनी सत्कार केला. यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भोरस माजी सरपंच गोपाळ पाटील, चित्रपट कलावंत साहेबराव काळे, आकाशवाणी कलावंत विकास शुक्ल, सौ.जुलेखा शुक्ल,सौरव पाटील, मुकेश गोसावी, सारंग जाधव,सर्वेश पिंगळे, कल्पेश मालपुरे, ऋषिकेश पाटील, शशिकांत जाधव, बबडी शेख, बबलू व्यास, अनिल चव्हाण, राहुल मोरे, आरिफ मेंबर, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमीत सुराणा आदि मान्यवर उपस्थित होते.