नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदाची द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये १०.१५ वाजता शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.
यावेळी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली.
राष्ट्रपती म्हणाल्या, “मी जिथून आले त्या समुदायात, भागात अगदी प्राथमिक शिक्षण हेही स्वप्नवत आहे. गरीब, मागासलेल्याचे प्रतिबिंब माझ्यात दिसते. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देतो की या पदावर काम करताना त्यांच्या हितासाठी तत्पर असेल.
संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे. मुर्मू म्हणाल्या, स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीयांवर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक कर्तृत्व नसून देशातील सर्व गरिबांचे ते यश आहे. माझे नामांकन हा पुरावा आहे की भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाहीत, तर ती स्वप्ने पूर्णही करू शकतात.

शपथविधीला ओडिशातील ६४ विशेष पाहुणे
मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमाला ओडिशातील 64 विशेष पाहुणे उपस्थित आहेत. शपथविधीनंतर राष्ट्रपती भवनात विशेष पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वांना संपूर्ण इमारत फिरवली जाईल. मुर्मू हे २५जुलै रोजी शपथ घेणारे देशाचे १० वे राष्ट्रपती असतील.