पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील रहिवाशी प्रकाश कांबळे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा (जळगांव जिल्हा ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष मिलिंद उर्फ विकास वामन अवसरमल यांच्या सहीने जळगांव (ग्रामीण) मतदार संघाचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या माजी सदस्या साधना भोळे उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगांव (ग्रामीण) संघटन वाढविणे, केंद्र शासन यांनी मागासवर्गीय (अनुसूचित जाती) साठी योजनांच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयांचा प्रसार करणे, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याभरात भक्कम व मजबूत करणे, भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी पोहचविणे या कामांसाठी प्रकाश कांबळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रकाश कांबळे यांचे जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे. प्रकाश कांबळे यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
