जळगाव : प्रतिनिधी
समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव या आमच्या संस्थेने भारूड व गवळण ,अभंग म्हणून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव आणि सचिव शोभा जाधव यांच्या हस्ते विठोबा-रखुमाई व नटराज पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली संस्थेच्या कलाकार तृप्ती बाक्रे यांनी बाजाराला विकण्या निघाली ही गवळण, रोहिणी निकुम यांनी विंचू चावला हे भारुड, श्वेतांबरी गरुड यांनी भावगीत , विशाल जाधव भक्ती गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली
समर्थ कला संस्था ही वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम नेहमी राबवत असते नाट्य, नृत्य, संगीत या तिन्ही कलांमध्ये संस्था काम करते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश लांबोळे ,भावेश पाटील, महेश कोळी ,कृष्णा बारी ,अक्षय पाटील, पायल साळवे, प्रणिता शिंपी, मयुरी जाधव ,खुशबु जाधव ,पूर्वा जाधव ,समर्थ जाधव यांनी परिश्रम घेतले