माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना पेट परीक्षेतून सूट मिळाव – क्रीडाशिक्षक महासंघातर्फे कुलगुरुनां निवेद
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काही विद्यापीठामध्ये शासनमान्य व दहा वर्षे सेवा झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. पूर्व परीक्षेत (PET) सूट देण्यात आलेली आहे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कक्षेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना देखील संशोधित कार्यात प्रोत्साहित करण्यासाठी व त्या माध्यमातून शिक्षकांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळण्यासाठी इतर विद्यापीठाप्रमाणे आपल्या विद्यापीठातही पी.एच.डी.पूर्व (PET) परीक्षेतून सूट मिळावी या मागणीचे निवेदन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही.एल.माहेश्वरी यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक (संघ)फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, जळगाव जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष सचिन महाजन व प्रा वसीम बेग मिर्झा यांनी दिले. याप्रसंगी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांचा जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.




















